अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांकडून मोठी कारवाई , या कारवाईत बड्या लोकांची नावे आल्यानं कारवाईची चर्चा जोरदार होत आहे

इचलकरंजी (कोल्हापूर) : पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बड्या लोकांची नावे आल्यानं कारवाईची चर्चा होत आहे. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली असून सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. यड्राव, तालुका शिरोळ इथल्या पार्वती इंडस्ट्रीजमध्ये हॉटेल अँकॉर्डवर पथकाने छापा टाकला. यावेळी तीन पानी जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 24 लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


 आतापर्यंत ही कापड मार्केट इचलकरंजी), विनोद बापू चव्हाण(वय 49 रा. रणझुंझार चौक, सांगली), नासिर हुसेन बशीर अहमद नदाफ (वय 48 रा. रामनगर, सांगली), विशाल बाळासाहेब माळी( वय 35 रा. सांगली संतोष), संतोष मनोहर खामकर (वय 45 रा. खामकर मळा, जयसिंगपूर), रमेश विश्वनाथ बावचे (वय 31 रा. आगार ता. शिरोळ)असे जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.


यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीज मधील हॉटेल अँकॉर्डवर विनापरवाना बेकायदेशीरपणे तीन पानी जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकाला मिळाली. या माहितीनुसार यड्राव येथील हॉटेल अँकॉर्डवर जुगार खेळताना सहा जण सापडले. त्यांच्याकडून रोख रकमेसह सहा मोबाईल, तीन - चार चाकी वाहने असा एकूण 24 लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळला. सहा जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area