इचलकरंजीत २४ तासात दोन खुन् झालेने खळबळ

 
इचलकरंजी  : येथील शांतीनगर परिसरातील क्त्तलखानाच्या मार्गील बाजूस एका तरुणाच्या डोक्यात जड वस्तू घालून खून करण्यात आला. आज सकाळी पोलिसांना आलेल्या निनावी फोननंतर हा प्रकार उघडकीस आला. निर्जनस्थळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या 24 तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. अपर पोलिसअधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनीयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चप्पल, दारूचीबाटली मिळून आली आहे. एका ठिकाणी खुन करून मृतदेह फरफटत नेऊन थोड्या अंतरावर टाकण्यात आला होता. मृताच्या पँटला चावी असल्यामुळे परिसरात वाहनाचा शोध पोलिस घेत होते.मृताची ओळख पटल्यानंतरच तपासाला अधिक गती येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area