राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील पशुसेवेकरिता गोपाल गौशाळेचे विश्वस्त सन्मानित

 


मुंबई, दि.२७: भिवंडी येथील श्री गोपाल गौशाळेच्या माध्यमातून काेरोना काळात गोरक्षण व गोवंश सेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी संस्थेचे विश्वस्त उमाशंकर रुंगटा व मोहनलाल अगरवाल यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २७ फेब्रु) करोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या वतीने राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते निवडक करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राज्यपालांनी मारवाडी समाजाच्या दातृत्वगुणाचे कौतुक केले. मारवाडी लोक सिक्कीम, उत्तराखंड तसेच नेपाळसह देशातील सर्व प्रदेशात आहेत. स्थानिक लोकांशी ते स्नेहभावाने वागत असल्यामुळे त्यांना कोठेही विरोध होत नाही. मारवाडी समाज दानशूर असून समाजातील लोकांनी गावागावात धर्मशाळा, शिक्षण संस्था, उभारून समाजाचे ऋण फेडले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते समस्त जैन महासंघाचे अशोक जैन व किशोर जैन, ‘रोटीघर’चे अध्यक्ष मनीष शहा व दीपिका शहा, भिवंडी येथील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसुझा, अग्रोहा विकास ट्रस्टचे संजय मित्तल, आकाश अग्रवाल व अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या पूजा धर्मपाल पोद्दार यांना करोना काळातील सेवेकरिता सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या  अध्यक्ष सुमन अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या.

000

Governor felicitates Corona Warriors who cared for Cows during pandemic

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated the trustees of the Shri Gopal Gaushala Bhiwandi for their services to the cause of protection of cows during the Covid 19 pandemic.

At a felicitation function held at Raj Bhavan on Saturday (27th Feb) Governor Koshyari felicitated Umashankar Rungta and Mohan Agarwal, trustees of the Shri Gopal Gaushala by presenting them a certificate of honour.

The felicitation was organized by the International Marwari Federation.

The Governor praised the Marwari community for its spirit of philanthropy on this occasion.

Ashok Jain and Kishore Jain of Samast Jain Mahasangh, Chairman of Roti Ghar Manish Shah and Smt Dipika Shah, Senior Police Inspector from Bhiwandi Mamta Lawrence Desouza, Sanjay Mittal of Agroha Vikas Trust were among those felicitated on the occasion. President of International Marwari Federation Summan Agrawal was present.

000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area