'लिव्ह इन'चा करुण अंत; तरुणीची आत्महत्या

 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

नागपूर: 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती.


स्विटीची २०१९मध्ये फेसबुकवरून राजसोबत ओळख झाली. दोघे फेसबुकवर चॅटिंग करायला लागले. त्याने स्विटीला लग्नाची मागणी घातली. तिने होकार दिला. स्विटीने आई-वडिलांना याबाबत सांगितले. तिच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. दोन महिन्यांपूर्वी स्विटी नागपुरात आली. ती राजसोबत आदर्शनगर येथे 'लिव्ह इन'मध्ये राहायला लागली. स्विटी आपली पत्नी असल्याचे राजने घरामालकाला सांगितले होते.

दरम्यान, राज हा एमआयडीसीत कामाला लागला. शुक्रवारी सकाळी स्विटीचा राजसोबत वाद झाला. काही वेळाने राज कंपनीत गेला. स्विटीने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. शेजाऱ्याने खिडकीतून बघितले असता स्विटी गळफास घेतलेली दिसली. शेजाऱ्याने राजच्या मोबाइलवर संपर्क साधला. एका नागरिकाने गिट्टीखदान पोलिसांना कळविले. पोलिस व राज हा घरी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून स्विटीचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area