गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने दुचाकीला दिली धडक;महिला गंभीर जखमी


इचलकरंजी:

गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. महानंदा मारुती कोकाटे (वय 34 रा. सरनोबतवाडी कोल्हापूर) असे जखमी महिलेचे नांव आहे. डेक्कन चौक परिसरात सायंकाळी सहा वाजता हा अपघात घडला. या घटनेेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिसात सुरु होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर येथील सरनोबतवाडी परिसरात राहणारे मारुती कोकाटे व त्यांच्या पत्नी सौ. महानंदा कोकाटे हे दोघेजण इचलकरंजी येथील नातेवाईकांकडे आले होते. सायंकाळच्या सुमारास ते कोल्हापूरला परतत असताना डेक्कन चौक परिसरात आले असताना गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या ट्रक (क्र. एमएच 43 बीजी 9846) ने कोकाटे यांच्या दुचाकीला (क्र. एमएच 09-4135) धडक दिली. यामध्ये महानंदा कोकाटे या ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे इचलकरंजी-हातकणंगले मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होतीTags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area