आरोपी तोहीम लाटक याने चित्रीकरण व फोटो घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न

 


इचलकरंजी : युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपी तोहीम लाटक याने चित्रीकरण व फोटो घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मोबाईल फुटला. पोलिस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

तोहीम लाटकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात माहिती घेण्यासह चित्रिकरण व फोटोसाठी शहरातील काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी  गेले होते. त्यावेळी न्यायालयाच्या आवारात लाटकरने गोंधळ घालत माझे फोटो, शूटिंग करायचे नाही, नाहीतर तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याला न्यायालयातून खासगी वाहनाद्वारे नेण्यात आले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर चित्रिकरण करत असताना शूटिंग करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांवर  पोलिसांसमोरच लाटकरने लाथ मारली. तसेच एकाचा मोबाईल फोडला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या अंगावर धावून जाण्याइतपत आरोपीची मजल गेलीच कशी असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Accused Tohim Latak tried to attack a media representative who came to take pictures and photos

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area