युवतीसआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तोहीम अमिन लाटकर याला दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 61 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

 इचलकरंजी : युवतीचा सतत पाठलाग करुन टेडी बेअरची मागणी करत त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तोहीम अमिन लाटकर (वय 30 रा. मंगळवार पेठ) याला दोषी ठरवत येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. शेळके  यांनी विविध कलमाखाली 10 वर्षे सक्तमजुरी आणि 61 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे पिडीत मुलीचा बुधवारी वाढदिवस असून त्याचदिवशी आरोपीला शिक्षा ठोठावली गेल्याने एकप्रकारे तिला न्यायच मिळाला आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एच. आर. सावंत-भोसले यांनी काम पाहिले.

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी, संशयित आरोपी तोहीम लाटकर व पिडीत मुलगी एकाच परिसरात राहण्यास आहेत. सन 2017 मध्ये टेडी बेअर मागण्याच्या बहाण्याने लाटकर हा पिडीत मुलीला रस्त्यात अडवून वारंवार त्रास देत होता. या संदर्भात पिडीत मुलीने घरच्यांना माहिती दिली होती. परंतु बदनामी होऊ नये या भीतीपोटी मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. त्यामुळे आरोपीला बळ मिळत गेल्याने 1 सप्टेंबर 2017 रोजी पिडीत युवती घरासमोरुन निघाली असताना लाटकर याने तिला रस्त्यातच अडवून त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार पाहून  त्यावेळी भागातील काही महिला व नागरिकांनी लाटकर याच्यापासून पिडीत मुलीची सुटका केली व तिला घरी पाठविले होते. परंतु सातत्याने वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून 7 सप्टेंबर 2017 रोजी पिडीत मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने गावभाग पोलिस ठाण्यात तोहीम लाटकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तपासी अधिकारी एन. एन. सुळ व तत्कालीन पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे  व पोलिस निरिक्षक रानभरे यांनी तपास करुन लाटकर याला अटक केली होती. या प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी व भागातील महिलांच्या साक्षी तसेच सरकारी वकिल सावंत-भोसले यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानत  न्या. एच. बी. शेळके यांनी आरोपी लाटकर याला विविध कलमाखाली शिक्षा ठोठावली. त्यामध्ये कलम 306 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 1 वर्षे सक्तमजुरी, कलम 354 अन्वये 2 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने सक्तमजुरी,  कलम 506 अन्वये 1 वर्ष सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 1 महिना सक्त मजुरी आणि लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायदा अंतर्गत कलम 12 नुसार 2 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. नुकसान भरपाईची रक्कम पिडीत मुलीच्या आई-वडीलास देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

वाढदिनीच मिळाला न्याय…
त्रासाला कंटाळून जीवनच संपविलेल्या पिडीत मुलीचा आज बुधवार (10 मार्च) रोजी वाढदिवस आहे. याचदिवशी आरोपीला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावून तिला वाढदिवसा दिनीच न्याय दिला.

Demanding a teddy bear by constantly chasing a young woman

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area