एनआयएचे पथक थडकले सचिन वाझेंच्या ठाण्यातील घरी

 ​​ स्कॉर्पिओ कारमध्ये मिळालेल्या स्फोटकांचा तपास करणाऱ्या एनआयएचे पथक बुधवारी अटकेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत को. ऑप. हौसिंग सोसायटीतील घरी चौकशीसाठी आले होते.


ठाणे:

स्कॉर्पिओ कारमध्ये मिळालेल्या स्फोटकांचा तपास करणाऱ्या एनआयएचे पथक बुधवारी अटकेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत को. ऑप. हौसिंग सोसायटीतील घरी चौकशीसाठी आले होते. दुपारपासून हे पथक वाझे यांच्या घरी होते, असे समजते. मात्र या पथकाने नेमकी कोणाची चौकशी केली याविषयी काहीच समजू शकले नाही. तसेच वाझे यांच्या घरी कोण-कोण उपस्थित होते याबाबत समजले नाही.रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एनआयएचे पथक वाझे यांना घेऊन त्यांच्या ठाण्यातील घरी आले होते. मात्र वाझे यांना त्यांच्या घरी कशासाठी आणले, याबाबत अधिक गूढ निर्माण झाले आहे.


एटीएसकडून डॉक्टरांकडे चौकशी दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस) मनसुख हिरन यांच्या मृत्यूची चौकशीप्रकरणी बुधवारी ठाण्यात आले होते. एटीएसच्या ठाणे युनिटच्या कार्यालयात या पथकाने मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडे चौकशी केल्याची माहिती एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र डॉक्टरांकडे अधिकाऱ्यांनी काय चौकशी केली, हे कळले नाही.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area