हापूसचा यंदा मोठा हंगाम

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाल्याचे दिसत असून या आंब्याची आवकही वाढत आहे. हापूसचे दर स्थिर असून आत्तापर्यंत बाजारात तेरा हजार....
नवी मुंबई:

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाल्याचे दिसत असून या आंब्याची आवकही वाढत आहे. हापूसचे दर स्थिर असून आत्तापर्यंत बाजारात तेरा हजार पेट्यांची आवक झाली आहे. तर इतर ठिकाणाहून इतर जातीचे आंबेही बऱ्यापैकी येत आहेत. हापूस घाऊक बाजारात सध्या पाचशे ते दोन हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे.


दरवर्षी डिसेंबर, जानेवारीपासून बाजारात सर्व ठिकाणांहून वेगवेगळ्या जातीचे आंबे यायला लागतात. यात कोकणातील हापूस आंब्याचे प्रमाण अत्यल्प असते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हापूसची आवक वाढायला सुरुवात होते आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात हा आंबा बाजारात येतो. एप्रिलमध्ये दहा हजार पेट्यांच्या पुढेच आंब्याची आवक पाहायला मिळते. तोपर्यंत तोतापुरी, बदामी हे दक्षिण भारतातील आणि कर्नाटकमधील आंब्याची आवक सुरू होते. यात कर्नाटकी आंबा सर्वात जास्त प्रमाणात बाजारात येतो. मात्र यावेळी इतर आंब्यांना मागे टाकत कोकणातील हापूस आंब्याने बाजारात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यातच बाजारात हाऊस आंब्याच्या तेरा हजार पेट्यांची आवक झाली आहे. ही आवक सिंधुदुर्ग, वेंगुर्ले, देवगड येथून होत आहे.


इतर आंब्यांची आवकही चार हजार पाचशे क्रेट झाली आहे. शिवाय सुटे आंबेही दोनशे ते तीनशे रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत, अशी माहिती बाजार समितीकडे नोंदवली गेली आहे.


मागणी मात्र कमी 

हापूसची आवक लवकर झाली असली त्यास अद्याप आवश्यक मागणी नाही. करोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असल्याने हापूससाठी ते हात आखडता घेत आहे, असे बाजारातील व्यापारी आणि माजी संचालक बाळासाहेब बंडे यांनी दिली.


हापूस आंब्याचे दरही स्थिर असून घाऊक बाजारात ते पाचशे रुपये ते दोन हजार रुपये डझन आहेत. हा भाव कमी झाला की मागणी वाढेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area