Amravati Farmer suicide : कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

 सोयाबीनचे पीक घेऊनही हवे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात कर्जाचा डोंगर. हे कर्ज फेडणार कसे या विवंचनेतून अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
अमरावती: 

तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नागोराव भीमराम रावेकर (वय ६०, रा. वऱ्हा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


रावेकर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यामध्ये ते सोयाबीनचे पीक घेत होते. या पीकातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यात त्यांच्यावर बँकेचे कर्ज देखील होते. ते फेडता येत नव्हते. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच, कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेची कुऱ्हा पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area