सचिन वाझे प्रकरण: अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

 अमृता फडणवीस त्यांनी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीत काही स्फोटकं आढळून आली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणावरुन विधानसभेच्या अधिवेशनात बराच गोंधळ झाला. हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केलेल्या संशयाचा दाखला देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची आणि निलंबनाची मागणी केली होती. राज्य सरकारने सचिन वाझे यांची केवळ बदली केलीस पण तपास 'एनआयए'कडे गेल्यानंतर वाझेंना अटक करण्यात आली आणि निलंबनही केलं गेलं. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.


एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या तडाख्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे आणि हॉस्पिटलमध्ये रूग्णांसाठी बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. पण अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सरकार कोविड सेंटर्समध्ये भ्रष्टाचार करताना दिसत आहे आणि आपल्या काही 'पिट्ठुंच्या' साथीने उद्योगपतींच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area