सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी जवान बनले देवदूत

 


सततच्या तुफान बर्फवृष्टीमुळं जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि गुलमर्गासह इतर  काही शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण प्रसंगी लष्कराचे जवान त्यांच्या मदतीला धावले आहेत.  बर्फवृष्टी सुरू असताना, एक गर्भवती महिला रुग्णालयात जात होती. त्याचवेळी लष्कराच्या जवानांनी तिला मदत केली. त्या गर्भवती महिलांना जवानांनी स्ट्रेचरवरच्या साह्यानं रुग्णालयात नेलं. हे जवान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले. जम्मू कश्मीरमधील कुपवाड़ा जिल्ह्यात ही घटना घडली. जवानाच्या या कर्तुत्वाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी जवानांच्या या कार्याला सोशल मीडियावर सलाम केलाय.
 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी होत आहे. हिमवादळामुळं अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाच्या घटनांमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area