दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
चितेगाव (औरंगाबाद): येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. यासंबंधी बारा जणांवर ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १४) घडली आहे. चितेगावपासून चार किलोमीटर अंतरावर आसलेल्या बोकुडजळगाव ग्रामपंचायत अंतर्गत आसलेल्या पाटोदेवडगाव येथे रविवारी (ता.१४) घराच्या जागेवरून गांगवे व आवारे, घनवट परिवारात शाब्दिक चकमक, शिविगाळसह कडाक्याचे भांडण झाले.
या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले असून एकमेकांवर विटकरा दगड फेकून मारल्याने यात कमल गांगवे, गेंदाबाई तरटे, लक्ष्मीबाई गांगवे, या तीन महिलांसह धोंडीराम गांगवे, मनोज गांगवे व कैलास गांगवे सहा जण जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिता रोहिदास गांगवे (वय३८) रा.पाटोदेवडगाव (ता.पैठण)यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिता पती व मुलाबाळांसह पाटोदेवडगाव येथे राहा आहेत. आमच्या घराच्यासमोर मोठा भाया धोंडीराम गांगवे यांनी विकत घेतलेली जागा असून त्यालगत मच्छिद्रनाथ आवारे यांची जागा आहे. धोंडीराम गांगवे यांनी विकत घेतलेल्या जागेवरून आप्पासाहेब घनवट, सुखदेव घनवट व बबन घनवट हे दोन दिवसापासून धोंडीराम यांच्या सोबत भांडत करत होते.
रविवारी ( ता. १४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धोंडीराम हे त्यांच्या घरासमोर असलेल्या विटा उचलून त्यांच्या मालकीच्या जागेवर लावत होते. मी माझ्या घराबाहेर ओट्यावर बसलेले होती. त्यावेळेस आमच्या गावातील मच्छिद्रनाथ आवारे, बाबासाहेब आवारे, नवनाथ आवारे, गणेश घनवट, बळीराम घनवट, चंद्रभान आवारे, राजु ढोले, विष्णु घनवट, बाबासाहेब आवारे, बबन ढोले, आप्पासाहेब घनवट, सुखदेव घनवट व कृष्णा घनवट हे सर्व लोकांनी धोंडीराम यास तुम्ही या जागेवर विटा लावू नका ही जागा तुमची नाही असे म्हणाले. त्यावेळेस धोंडीराम म्हणाले की माझ्या पुतणीचे लग्न आहे. आम्हाला येथे मंडप लावायाचा आहे. त्यावेळेस मच्छिद्रनाथ आवारे व त्यांच्या सोबतचे वरील लोकांनी धोंडीराम यांनी शिविगाळ करत जातीयतेवर" चमटे लई माजले तुम्ही कोणाशी खेळता तुमचा माज जिरवतो तुम्ही गावात कसे राहता तुमचा नामोनिशान गावातुन काढून टाकतो " असे म्हणून धोंडीराम यांच्यावर विटा व दगड फेकून हाताला, कपाळावर, तोंडाला, डोक्यावर विटाने मारहाण केल्याने रक्तबंबाळ झाले होते. त्याच्यावर बिडकिन ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
इतर जखमींवर बिडकिन ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बिडकिन पोलीस ठाण्यात अनिता रोहिदास गांगवे यांच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन ऑट्रासिटी गुन्हा दाखल केले आहे. उपविभागीय पोलीस आधिकारी गंगापुर प्रभारी पैठण संदीप गावीत यांनी भेट देवून पाहाणी केली. श्री गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक राहूल पाटील,जमादार सोमिनाथ तागडे व संजय चव्हाण तपास करत आहे.