औरंगाबाद : विकलेल्या दागिन्यांवरून पत्नीचा खून

 प्लॉट घेण्यासाठी पत्नीचे दागिने विकले. दागिने विक्रीतून आलेल्या पैशावरून पत्नीशी वाद झाला. या वादानंतर पत्नी कविता त्रिवेदीची हत्या केल्याची माहिती आरोपी आणि तिचा पती सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (३५, रा. रूक्मिणी अपार्टमेंट) याने पोलिसांना दिली.




औरंगाबाद :

प्लॉट घेण्यासाठी पत्नीचे दागिने विकले. दागिने विक्रीतून आलेल्या पैशावरून पत्नीशी वाद झाला. या वादानंतर पत्नी कविता त्रिवेदीची हत्या केल्याची माहिती आरोपी आणि तिचा पती सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (३५, रा. रूक्मिणी अपार्टमेंट) याने पोलिसांना दिली. चिकलठाणा पोलिसांनी आरोपीला दिवमधून अटक केली. या अटकेनंतर त्यांनी त्या रात्री घडलेल्या प्रसंगाबाबत पोलिसांना माहिती दिली.


पिसादेवी भागातील रूक्मिणी अपार्टमेंटमध्ये १६ फेब्रुवारी रोजी कविता त्रिवेदी या महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात कविताचा खून करून घराला बाहेरून लॉक करून तिचा पती सिद्धेश पळून गेला होता. मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर लोकांनी चिकलठाणा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात सिद्धेशविरोधात जगदीश इश्वरराव अवस्थी (रा. नाशिक) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. १६ फेब्रुवारीपासून पोलिस सिद्धेश त्रिवेदी याचा शोध घेत होते.

दरम्यान, सिद्धेश त्रिवेदी हा दिव-दमण येथे असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्या आधारावर सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, रवींद्र साळवे, पोलिस अंमलदार दीपक सुरोशे, एस. बी. घुगे यांनी दिव पोलिसांच्या ताब्यातून सिद्धेश साळवे याला ताब्यात घेतले.

या प्रकरणात सिद्धेश त्रिवेदीने खून करण्यामागील कारणाची माहिती पोलिसांना दिली. प्लॉट घेण्यासाठी सिद्धेश याने कविता हिचे दागिने विकले होते. या दागिन्याचे पैशावरून रात्री पती-पत्नीत वाद झाला. या वादात रागाच्या भरात हत्या केल्याची कबुली सिद्धेश याने दिली.


औरंगाबाद ते पुणे दुचाकीवर गेला 

पत्नीची हत्या करून सिद्धेश हा पहाटे पिसादेवीहून एका मोपेडवर पुण्यापर्यंत गेला होता. पुण्याला गेल्यानंतर तो दिल्लीला विमानातून गेला. त्यानंतर तो दिव दमणला पोहोचला होता. पत्नीच्या विकलेल्या दागिण्याच्या पैशातूनच त्याने हा प्रवास केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


असा पकडला गेला सिद्धेश 

दीव येथे गेल्यानंतर सिद्धेश हा काही दिवसांपासून दीवच्या समुद्र किनाऱ्यावर आत्महत्या करण्यासाठी येत होता. दीवच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याबाबत चिकलठाणा पोलिसांना माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area