पोलिस ठाण्यात पोलिसच असुरक्षित! बहाद्दराने पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत दिली जिवे मारण्याची धमकी!

 पोलिस ठाण्यात आणलेल्या या महाभागांनी पोलिसांच्या अंगावर धाऊन जात त्यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केलीबीड:
वाहनात इंधन भरल्यानंतर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यासह मॅनेजरला शिवीगाळ केली. या प्रकरणी ठाण्यात आणलेल्या या महाभागांनी पोलिसांच्या अंगावर धाऊन जात त्यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यावरुन शहर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

संदीपान बडगे व अभिषेक पवळ हे दोघे रविवारी (ता. १४) उशिरा जीप घेऊन (एम. एच. २३ ए. एक्स ५९३९) चर्‍हाटा फाट्यावरील पेट्रोलपंपावर गेले. इंधन भरल्यानंतर पैसे मागणाऱ्या आकाश शिंदे या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले व्यवस्थापक अमोल कदम यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती शिवीजीनगर ठाण्याच्या पोलिसांना झाल्यानंतर ठाण्याचे जालिंदर बनसोडे व अन्य कर्मचारी त्याठिकाणी गेले. तेथे गेल्यानंतर शिंदे व कदम यांना ठाण्यात आणले.

त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ हे दोघे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले, त्यांनी बनसोडे यांचे गचुरे धरत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ठाण्यातच बडगे यांनी बनसोडे यांना शिव्या दिल्या. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संदीपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्यासह अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area