कोल्हापूर: इंधनाचे दर वाढत आहेत. पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहे. भविष्यातही वाढ होत राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल बाइकला पर्याय म्हणून नागरिक ई-बाइक खरेदीला पसंती देत आहेत. शहरात महिनाभरापासून सरासरी दररोज २५ इलेक्ट्रॉनिक्स बाइकची विक्री होत आहे. केएमटी बससेवेव्यतिरिक्त शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुसरी व्यवस्था नसल्याने रिक्षा, वडाप यावरच प्रवास अवलंबून असतो; मात्र रिक्षाचे भाडेही पडवडत नसल्याने तसेच पेट्रोल बाइक चालवणे ही खर्चिक बाब झाल्याने ई-बाइक खरेदीकडे कल वाढला आहे.
२२ ई-बाइक्सचे शोरूम असून, एका शोरूममधून रोज दोन ते तीन ई-बाइक्स विकल्या जात आहेत. ७२ व्होल्टपर्यंत इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांना आरटीओ अगर इतर नोंदणीची गरज नाही. गाडीचा वेग ५० किमी. प्रती तासाच्या पुढे जात नसल्याने या वाहनधारकांना लायसन्सची गरज पडत नाही. त्यामुळेही लोकांना ही बाइक फायद्याची ठरत आहे.
ई-बाइकची वैशिष्ट्ये पेट्रोलऐवजी बॅटरी चार्जिंगवर धावणार बॅटरीच्या क्षमतेनुसार ५० ते ८० किमीपर्यंत धाव बॅटरी चार्जिंगसाठी कमीत कमी खर्च आरटीओ नोंदणी, परवाना, प्लग, कार्बोरेटर, इंजिन ऑईलची गरज नाही प्रदूषणमुक्त, आवाजविरहित गाडी ई-बाइक ही संकल्पना कोल्हापुरात अजून रुजली नसली तरी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. दोन महिन्यांत विक्री चांगली होत आहे.