पुणे पोलिसांना पाहिजे असलेला कुविख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा पोलिसांनी पकडले
 सातारा  : पुणे पोलिसांना पाहिजे असलेला आणि युद्ध पातळीवर शोध सुरू असणारा कुविख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा पोलिसांनी पकडले आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातून त्याला पकडण्यात आले आहे, असे सातारा पोलिसांनी सांगितले आहे.

दोन खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे जंगी रॅली काढत रॉयल इंट्री मारल्याने गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर त्याच्यावर पिंपरी चिंचवड व पुणे व खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

पण यानंतर तो फरार झाला. पुणे पोलिसांची अनेक पथके त्याचा कसून शोध घेत होती.फार्म हाऊस ते घर अशी झडती देखील घेण्यात आली होती. पण तो मिळत नव्हता. असे असताना तो तळेगाव दाभाडे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मावळ कोर्टात हजर झाला व त्याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर निघून देखील गेला होता. यामुळे पुणे पोलिसांच्या शोध पथकावर प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील मेढा येथे गजानन मारणे हा आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी खात्री केली आणि सापळा रचला. त्यावेळी डस्टर गाडीतून गजा मारणे येताच त्याला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area