चित्रीकरणाची हौस, कारवाईने फिटली; गौहर खान विरोधात गुन्हा दाखलमुंबई:

 करोनाने ग्रासले असले तरीही चित्रीकरणात भाग घेण्याचा उत्साह अभिनेत्री गौहर खान हिला महागात पडला आहे. मुंबई पालिकेने तिच्याविरोधात तातडीने कारवाई करत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


ओशिवरा परिसरात राहणाऱ्या गौहर खानने करोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल ११ मार्च रोजी आला असता त्यात तिला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तिला घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्बंध लागू होता. असे असतानाही गौहर खान हिने विलगीकरणाचा नियमभंग करत थेट चित्रीकरणात सहभाग घेतला. पालिकेच्या आरोग्य विभागाने तिच्या घरी जाऊन झाल्या प्रकारची शहानिशा करण्यात आली. त्यांनतर पालिकेच्या के-पश्चिम विभागातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area