-पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
-वीजबील वसूलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण
-महमंदवाडी पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल
पुणे :
पुण्यात महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीजबील वसूलीसाठी कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्यामुळे महमंदवाडी पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद केली असून त्यानुसार सचिन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हा सर्व प्रकार मोबाईल व्हिडिओमध्ये कैद झाला असून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
शिंदे या वीज ग्राहकाची 1 मार्च 2020 पासून 19 हजार रुपये विजबिलाची थकबाकी होती. त्यांना विजबिल भरण्याबाबत सूचना केली होती. महावितरणच्या गंगा व्हिलेज शाखा कार्यालयांतर्गत महंमदवाडीमध्ये (स.नं.59, तरवडेवस्ती) शिंदे याच्याकडे वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अविनाश भोसले हे गेले होते. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे याने आरडाओरड करीत दमदाटी करण्यास सुरवात केली. तसेच घराच्या गेटवर थांबून शिवीगाळ करीत हातात बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचे तक्रारीत नुमद केले आहे. महंमदवाडी पोलीस चौकीमध्ये मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार सचिन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.