नवी दिल्ली, दि. १२ : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 23,285 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,13,08,846 वर जाऊन पोहोचली आहे. भारतात काल 15,157 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,09,53,303 वर पोहोचली आहे. काल देशात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,58,306 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,97,237 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 2,61,64,920 लोकांना लस देण्यात आली आहे.
राज्यात आज 14317 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7193 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2106400 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 106070 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.94% झाले आहे.
काल गुरुवारी केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोनावरील लसीची किंमत कमी करण्याबाबत चर्चा झाली असून ती सध्याच्या किंमतीपेक्षा निश्चितच कमी असणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलंय की, सरकार कोविशील्ड लसीची किंमत पुन्हा एकदा ठरवत असून ती नक्कीच सध्याच्या किंमतीपेक्षा लक्षणीयरित्या कमी असेल. तिची किंमत 200 रुपये प्रति डोस या किंमतीपेक्षा कमी असणार आहे.