...म्हणून कुख्यात गुंड गजा मारणेचा जामीन फेटाळला

 तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या
 पुणे:

तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोणे यांनी हा आदेश दिला.

गजानन उर्फ गजा मारणे (४८, रा. शास्त्रीनगर), रूपेश मारणे (वय ३८), सुनील बनसोडे (४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत पवार (३४), गणेश हुंडारे (३९), प्रदीप कंधारे (३६), बापू बागल (३४), अनंता कदम (३७), सचिन ताकवले (३२) आणि संतोष शेलार अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.

या आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यातदेखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दाखल अटकपूर्व जामिनाचा अर्जदेखील फेटाळण्यात आला आहे. रॅली काढून दहशत पसरविण्याचा प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले, याचा तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना सरकारी वकील कावेडिया यांनी केला.

..म्हणून जामिनाला विरोध समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने आरोपींनी रॅली काढली. त्याचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. आरोपींनी चार जिल्ह्यांतील जमावबंदीचे आदेश धुडकावले. मारणे व त्याच्या साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीत. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी जामिनाला विरोध करताना केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area