सोन्याचे आमिष दाखवून अलिशान कार घेत केली फसवणूक

सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून तिघांनी एका व्यक्तीकडील 2300 ग्रॅम सोने व अलिशान घेऊन त्यांची फसवणूक केली. 
पुणे : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून तिघांनी एका व्यक्तीकडील 2300 ग्रॅम सोने व अलिशान घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


समीर शौकत इनामदार शेख (वय 35, रा. वारजे, मूळ रा. परळी, सातारा), रश्‍मी समीर इमानदार ( वय 30 ) , गौरीहर हनुमंत भागवत (वय 29, रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रितेश बाबेल (वय 42, रा. सॅलसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च 2017 ते मार्च 2021 काळात सॅलीसबरी पार्कमध्ये घडली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश व समीर यांची एकमेकांशी ओळख होती. या ओळखीतूनच समीरने प्रितेशला सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले होते. सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले होते. त्यानंतर प्रितेश यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्याकडे 2300 ग्रॅम सोने दिले. त्याचबरोबर समीरने प्रितेशकडील अलिशान कारही दिली.


दरम्यान, नफा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादने त्यांच्याकडे सोने व त्यांची अलिशान कार देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानतंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area