काही दिवसांपासून शहरात खूण आणि खूनी हल्ल्याचे सत्र सुरू असताना या खूणी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इचलकरंजी (कोल्हापूर) :
शहरातील महेश सेवा समिती समोर असलेल्या इराणी बिल्डींगमध्ये कापड पॅकिंग करणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने खूणी हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रेमाराम चौधरी (वय 42) असे त्याचे नाव आहे. चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्लेखोर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपासून शहरात खूण आणि खूणी हल्ल्याचे सत्र सुरू असताना या खूणी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इराणी बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर प्रेमाराम चौधरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते कापड पॅकिंग करणाऱ्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने बिल्डिंगच्या बंद गेटचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला. डोक्यावर आणि अंगावर वार केल्याने रक्तबंबाळ अवस्थेत चौधरी मदतीसाठी बिल्डिंगमध्ये धावू लागले. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.