उपराजधानी बनतेय क्राईम कॅपिटल; गुंडांचा सुळसुळाट; क्षुल्लक वादांतून होताहेत चाकू आणि शस्त्रांनी वार

 


नागपूर : उपराजधानीतील गुंड चांगलेच सोकावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना समोर येत आहेत. घरगुती वादातूनही गंभीर स्वरुपाच्या घटना घडत आहेत. गुरुवारी हुडकेश्वर हद्दीत दोघांनी चाकुने वार करीत १५ वर्षीय मुलाला जखमी केले. तर, एमआयडीसी हद्दीत मुलाने फरशीने फटके हाणून जन्मदात्या आईच्या हत्येचा प्रयत्न केला.

जुने सुभेदार ले-आउट येथील गंगासोना अपार्टमेंटमध्ये राहणारा अथर्व राऊत (१५) हा गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भाऊ आणि मित्रासह ट्युशनला जात होता. हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीतील दुर्गानगर उद्यानाजवळील मैदानाजवळून जात असताना १७ ते २३ वर्षे वयोगटातील दोघे तिथे आले. कोणतेही कारण नसताना वाद घालत शिवीगाळ करू लागले.  काही क्षणातच हातबुक्कीने मारहानही सुरू केली. त्याचवेळी आरोपींपैकी एकाने जवळचा चाकू काढून त्याचे डोके व पंज्यावर वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दुसरी घटना एमआयडीसी अंतर्गत घडली. वानाडोंगरी येथील रहिवासी लक्ष्मीबाई लांडगे (६५) या गुरुवारी सकाळी घरीच हजर होत्या आरोपी मुलगा राजू (२८) याने पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. लक्ष्मीबाई त्याला टाळत होत्या. संतापाच्या भरात राजूने घरातील फरशी उचलून त्यांचे डोके व हातावर फटके हाणून गंभार जखमी केलै. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area