उपमुख्यमंत्र्यांनी MPSC परीक्षेचं खापरं फोडलं बोर्डावर

 ''राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीक्षेबाबत झालेल्या गोंधळाचं खापर एमपीएससीवर फोडलं आहे. त्यांनी म्हटलं की, ''एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं.'' त्याआधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही म्हटलं होतं की, ''एमपीएससीने हा निर्णय परस्पर घेतला असून याबाबत मला अंधारात ठेवलं.''


पुणे :
राज्यात एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. गुरुवारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतल्याचं समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय नसल्याचंही दिसून आलं. आता एमपीएससी परीक्षा 21 मार्चला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीक्षेबाबत झालेल्या गोंधळाचं खापर एमपीएससीवर फोडलं आहे. त्यांनी म्हटलं की, ''एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं.'' त्याआधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही म्हटलं होतं की, ''एमपीएससीने हा निर्णय परस्पर घेतला असून याबाबत मला अंधारात ठेवलं.''

काय म्हणाले अजित पवार ''एमपीएसीच्या विद्यार्थ्यांबाबत जे झालं ते दुर्दैवी होतं. कोणत्याही विद्यार्थी- 

विद्यार्थ्यींनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नाही पाहिजे. एमपीएसीने व्यवस्थित प्रकरण हाताळायला हवे होते. हे प्रकरण हाताळायला ते कमी पडली आहे.'' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रकरणाचे खापर एमपीएसी बोर्डावर फोडले आहे. ''MPSC ही स्वायत्त संस्था आहे हे सर्वांना माहित आहे. काहींनी राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला. आमचा MPSC च्या मुलांना पाठिंबा आहे. सरकार काहीतरी वेगळ करतेय असा भासविण्याचा प्रयत्न काल झाला. मुख्यमंत्र्यानी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यानंतर MPSCने तिन्ही परीक्षा कोणत्या तारखेला जाहीर होणार , याबाबत आज पत्रकही जाहीर केले आहे'' अशी माहिती पवार यांनी बोलताना  दिली.

विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवावा दरम्यान, ''राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाने 10 मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात असल्याची भुमिका MPSCने आज स्पष्ट केले. याबाबत बोलताना पवार म्हणाले,  ''अभ्यास चालू ठेवा, निश्चितपणे मार्ग काढला जाईल, कारण नसताना रस्त्यावर येऊ नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत विद्यार्थ्यांना धीर दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area