कोल्हापूर ब्रेकिंग : गोकुळ निवडणूकीचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

 


कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (Gokul) निवडणूक पुढे ढकलावी, यासाठी गोकुळने दाखल केलेली याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ज्यावेळी निवडणूक होईल, त्यावेळी कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून सरकारनेच निर्णय घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

कोरोना संसर्गामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोकुळ दूध संघालाही हा नियम व आदेश लागू असल्याचे कारण देत गोकुळने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज सुनावणी झाली. सुनावणीमध्ये गोकुळने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. दरम्यान, गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरील हकरती दाखल करणे, सुनावणी घेणे आणि त्याची निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता निवडणूक होणार की पुढे ढकलणार याकडे सभासदांसह राज्याचे लक्ष लागूल राहिले होते. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता अंतिम मतदार यादीही आज प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळ निवडणूकीची रणधुमाळीला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही.

"यापुढील सर्व निवडणुका आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. याला गोकुळ अपवाद नाही. त्यासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील आणि पी.एन पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. जेव्हा कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर बैठक घेऊन चर्चा करणार आहोत." 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area