सातशेचा गाउन पडला सव्वालाखाला; नौदलातील महिला डॉक्टरची 'अशी' झाली फसवणूक

 कुलाबा येथील नौदलाच्या एका महिला डॉक्टरला ऑनलाइन गाऊन मागविणे चांगलेच महागात पडले आहे. केवळ ७५० रुपयांच्या एका गाऊनसाठी या डॉक्टरला तब्बल १ लाख १५ हजार रुपये मोजावे लागले.कुलाबा:
कुलाबा येथील नौदलाच्या एका महिला डॉक्टरला ऑनलाइन गाऊन मागविणे चांगलेच महागात पडले आहे. केवळ ७५० रुपयांच्या एका गाऊनसाठी या डॉक्टरला तब्बल १ लाख १५ हजार रुपये मोजावे लागले. या ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी या महिला डॉक्टरने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.


नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने अॅमेझॉनवरून नाईट गाऊन खरेदी केला. यासाठी त्यांनी बँक खात्यातून ७५० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. यानंतर ९ मार्च ते १५ मार्च या कालावधीत गाऊन घरपोच मिळेल, असे नोटिफिकेशन अमेझॉनच्या वतीने देण्यात आले. ११ मार्च रोजी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर डिलिव्हरी बॉय आल्याचे कळताच डॉक्टरने पार्सल घेण्यासाठी एका तरुणाला पाठविले. परंतु उशीर झाल्याने डिलिव्हरी बॉय निघून गेला. गाऊन मिळाला नसतानाही ऑर्डर पोच झाल्याचा संदेश डॉक्टरच्या मोबाइलवर आला. डॉक्टरने अॅमेझॉन ॲपवर असलेल्या क्रमांकावर तक्रार नोंदवली. काही वेळातच त्यांना एक फोन आला आणि त्या व्यक्तीने डॉक्टरला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यावरील लिंकवर जाऊन १० रुपये भरण्यास सांगितले.

डॉक्टरने या लिंकवर १० रुपये पाठवताना आपल्या डेबिट कार्डचा तपशील भरला. हा तपशील भरताच ४० हजार रुपये कापले गेले. त्यानंतर २५ हजार तीन वेळा बँक खात्यातून परस्पर वळते करण्यात आले. वारंवार पैसे जात असल्याने डॉक्टरने प्रतिनिधीला विचारले. सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हे होत असल्याचे कारण पुढे करून, पैसे परत मिळतील असे त्याने सांगितले आणि फोन कट केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area