याचिकेनुसार, २८ व २९ मे रोजी सकाळी रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये दाखल झालेल्या ४ मुलांचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. परिचारिका विद्या थोरात यांनी हे इंजेक्शन मुलांना दिले.
नागपूर : अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील एनआयसीयूचे तत्कालीन अधिकारी डॉ. भूषण कट्टा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोषमुक्त केले. त्यांच्यावर ४ नवजात मुलांच्या हत्येचा आरोप होता. मे २०१८ साली रुग्णालयातील परिचारिकेने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे ४ नवजात मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अमरावती सिव्हिल सर्जनच्या तक्रारीवरून डॉ. कट्टा यांच्याविरुद्ध अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हे रद्द करावे, या विनंतीसह त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
याचिकेनुसार, २८ व २९ मे रोजी सकाळी रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये दाखल झालेल्या ४ मुलांचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. परिचारिका विद्या थोरात यांनी हे इंजेक्शन मुलांना दिले. यावेळी डॉ. कट्टा तेथे कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कर्तव्यावर होते. परंतु, ते अनुपस्थित होते. त्यामुळे, याचिकाकर्त्यालाही या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले होते. याचिकाकर्त्याविरूद्ध भादवी ३०४ आणि ३४ अन्वये गाडगे नगर पोलिस स्टेशन, अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला
याचिकाकर्त्याने या दाखल गुन्ह्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात मनुष्यवधाचे आरोप लावताना आरोपीने मुद्दाम ती घटना घडवून आणली, ही बाब सिद्ध व्हायला हवी. मात्र, याचिकाकर्ते यावेळी उपस्थित नव्हते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे, त्यांना या घटनेची माहिती नव्हती. तसेच, मुलांचा मृत्यू व्हावा या उद्देशाने ते कर्तव्यावर गैरहजर होता, असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने डॉ. कट्टा यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.