'त्या' रात्री PPE किट घालून स्कॉर्पियो जवळ गेलेली व्यक्ती सचिन वाझे?

 सचिन वाझेंना चालून दाखवावे लागणार.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळील कार स्फोटक प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.  अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करण्यात आली होती, त्यावेळी सचिन वाझे सुद्धा तिथे उपस्थित होते का ? याचा तपास आता एनआयए करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणात सचिन वाझेंना अटक केली


अँटिलिया जवळ कार पार्क केली, त्या रात्री एक व्यक्ती पीपीई किट घालून तिथे फिरताना सीसीटीव्हीमध्ये आढळली होती. ती व्यक्ती सचिन वाझे होते का? याचा तपास एनआयए करत असल्याचे एएनआयने म्हटले आहे. या कटामध्ये अनेक लोक सहभागी आहेत. PPE किट घातलेली व्यक्ती, त्यांच्यापैकीच कोणी एक आहे का? हे शोधून काढण्यासाठी त्यांची चालण्याची स्टाइल आम्ही तपासत आहोत. वाझे ताब्यात आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा चालण्याची पद्धत आम्ही तपासणार आहोत, असे मिड डे ने एनआयए अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

या प्रकरणाचा तपास करताना यंत्रणेला अल्टामाऊंट रोडवरील सीसीटीव्ही फुटेज आढळले. त्यामध्ये इनोव्हामधून पीपीई किट घालून उतरलेला व्यक्ती स्कॉर्पियोजवळ जाताना दिसला. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेंवर संशय आहे. एनआयए स्फोटक प्रकरणाचा तपास करतेय, तर एटीएसक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे.   

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area