दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, आजपासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर लेक्चर सुरू

 या तासिकांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ‘ट्विटर’वरून माहिती दिली आहे.

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असताना, आता शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर पुन्हा एकदा विषयनिहाय तासिका दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तासिका सोमवारपासून (ता.१५) दाखविण्यात येणार आहेत. 

या तासिकांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ‘ट्विटर’वरून माहिती दिली आहे. या तासिकांचे इयत्तानिहाय आणि विषयनिहाय दैनंदिन वेळापत्रक ‘www.maa.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत या तासिका दाखविण्यात येणार आहेत, अशा माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. 

‘सह्याद्री’ वाहिनीवरील दहावी-बारावीच्या तासिकांचे वेळापत्रक :  

वार : वेळ  सोमवार : दहावी- दुपारी १२.३० ते १.०० / बारावी : दुपारी २.३० ते ३.३०  मंगळवार ते शुक्रवार : दहावी- दुपारी १२.३०ते १.०० आणि दुपारी १.३० ते २.००/ बारावी : दुपारी २.३० ते ३.३०


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area