अमरावती : गोमांस विक्रेत्याला अटक

 चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक शहर हद्दीत कसाब पुरा या ठिकाणी रेड केली असता संबंधित आरोपी कडून 1 क्विंटल पेक्षा अधिक गौमांस आणि
अमरावती : चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक शहर हद्दीत कसाब पुरा या ठिकाणी छापा टाकला असता संबंधित आरोपीकडून १ क्विंटल पेक्षा अधिक गौमांस आणि एक जिवंत गाई जप्त करण्यात आली.


या कारवाईमध्ये आरोपी अब्दुल शकुर कुरेशी इशमाईल रा.कसाब पुरा चांदुर बाजार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कत्तलसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच ५ वर्ष वय असलेले जिवंत गौवंश ताब्यात घेण्यात आले.


ही कारवाई ठाणेदार सुनील किंनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर,पोलीस हेड कॉस्टबल विनोद इंगळे,नाईक पोलीस कॉस्टबल वीरेंद्र अमृतकर यांनी केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area