विक्रम खलाटेंनी केली सचिन वाझेंची चौकशी, कोण आहेत खलाटे वाचा सविस्तर

 या प्रकरणात मुख्य तपास अधिकारी म्हणून आयपीएस विक्रम खलाटे पाहत आहे.  काल दिवसभरात वाझेंची चौकशीही त्यांनीच केली आहे. 
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ कार पोलिसांना सापडली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात मुख्य तपास अधिकारी म्हणून आयपीएस विक्रम खलाटे पाहत आहे. 


विक्रम खलाटे हे भीमा कोरेगाव प्रकरणाचे एनआयएचे मुख्य तपास अधिकाराही आहेत. आयपीएस विक्रम खलाटे हे सध्या NIA मुंबईचे एसपी म्हणून कार्यरत आहेत. काल दिवसभरात वाझेंची चौकशीही त्यांनीच केली आहे

कोण आहेत विक्रम खलाटे

  • मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या जेट एअरवेज विमानाच्या हायजॅकिंग प्रकरणाचा तपासही विक्रम खलाटे यांनी केला होता. (2016 च्या अँटी हायजॅकिंग ऍक्टनुसार हा तपास NIA ने केला होता). 
  • अनेक प्रकरणात विक्रम खलाटे यांनी उत्कृष्ट तपास केल्यामुळे त्यांना केंद्रीय गृहखात्यातर्फे देण्यात येणाऱ्या युनियन होम मिनिस्टर मेडलने सन्मानित करण्यात आल आहे.
  • विक्रम खलाटे हे बारामतीमधील लाटे गावचे अधिकारी असून 2008 आणि 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे.

सचिन वाझे यांना NIA कडून अटक  

मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना  एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घरबाहेर गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आलीय.


सापडली 'ती' पांढरी इनोव्हा कार 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ कार पोलिसांना सापडली होती. या स्कॉर्पिओ बरोबरच एका इनोव्हा कारचा देखील समावेश होता. त्यानंतर पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून या कारचा शोध घेत होते. दरम्यान ती कार मध्यरात्री पोलिसांच्या हाती लागली आहे.  सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर NIA नं ही कार ताब्यात घेतली आहे. असं बोललं जात आहे की, या संपूर्ण प्रकरणात आता अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे. 


NIAने ताब्यात घेतलेली  पांढऱ्या रंगाची कार ही काल रात्री मुंबई पोलिस आयुक्तालयातून ताब्यात घेतल्याचं माहिती सुत्रांनी दिली आहे.  ही कार गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तालय परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  या कारच्या मागे मुंबई पोलिस असं लिहिलं आहे.  ही कार CIU पथकाची असल्याचे तपासात समोर आले असून  सचिन वाझे ही कार वापरत होते. ही कार गुन्ह्यात वापरली असल्याचा संशय NIA ला आहे. त्यामुळे सीआययूच्या अधिकाऱ्यांची देखील या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area