धक्कादायक! लहान मुलीचे लैंगिक शोषण; वयोवृद्ध दाम्पत्याला दहा वर्षांची शिक्षामुंबई :

गिरगावमध्ये शेजारच्या चार वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतेच ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या दाम्पत्याला दोषी ठरवले आणि त्यांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

आठ वर्षांपूर्वीच्या या घटनेत या दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या चार वर्षीय मुलीवर त्यांच्या घरी बोलावले आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले, असा आरोप होता. पीडित मुलीने आईला ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांत एफआयआर नोंद झाला होता. पोलिसांनी पीडित मुलगी व आईची साक्ष नोंदवतानाच मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालाचा आधार घेतला. तसेच परिस्थितीजन्य पुरावेही मांडले. खटल्याच्या सुनावणीअंती न्या. रेखा पांढरे यांनी आरोपी दाम्पत्याला दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. आजी-आजोबांच्या वयाचे असलेल्या आरोपींनी पीडित मुलीची नातीप्रमाणे काळजी घेण्याऐवजी तिचे लैंगिक शोषण केले, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area