अमली पदार्थांचे गोवा 'कनेक्शन'

 मुंबईत वापरल्या जाणाऱ्या अमली पदार्थांचे गोवा कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्यरोने (एनसीबी) गोव्यात याबाबत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत.





मुंबई:

मुंबईत वापरल्या जाणाऱ्या अमली पदार्थांचे गोवा कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्यरोने (एनसीबी) गोव्यात याबाबत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये जवळपास १,३४८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी मागील सहा महिन्यांपासून धडक कारवाई करीत मुंबईतील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त केले. तरीही मुंबईत काही प्रमाणात गोव्याहून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता वानखेडे यांनी गोव्यात धडक कारवाई सुरू केली आहे.


यासंबंधी पहिला छापा तेथील अस्सागाव येथे टाकण्यात आला होता. त्यामध्ये चरस २८ ग्रॅम, कोकेन २२ ग्रॅम, गांजा ११०० ग्रॅम व १६० ग्रॅम अन्य अमली पदार्थांसह एकूण १,३१० ग्रॅम साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आफ्रिकन युवकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही या प्रकारच्या तस्करीत कुख्यात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. अन्य एका मोहिमेत मिरामार बीचजवळ हेमंत शाह नावाच्या मोठ्या अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३० ग्रॅम चरससह अन्य पदार्थ जप्त करण्यात आले. हेमंत शाहचे नाव अनुज केसवानी या मोठ्या दलालाच्या चौकशीतही समोर आले होते.


या दोन छाप्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने पुन्हा एका मोठा छापा वॅगाटोर बीचवरील लार्वी रिसॉर्ट, शिवा व्हॅली व मंकी बारवर शुक्रवारी रात्री टाकला. त्यामध्ये ३३ ग्रॅम मेफेड्रोन, ५.१० ग्रॅम हेरॉइनसह मारुजुआना, हशीश या महत्त्वाच्या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area