संकटातून मार्ग काढण्यासाठी नृत्यशिक्षकाने निवडला चुकीचा मार्ग आणि...

तेलंगणच्या वारंगलमधील एका शाळेत तो नृत्यशिक्षक आहे. करोनामुळे शाळा बंद पडली. काय करावे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्याने नवा मार्ग निवडला खरा, पण चुकीचा निवडला. नागपूर:

तेलंगणच्या वारंगलमधील एका शाळेत तो नृत्यशिक्षक आहे. करोनामुळे शाळा बंद पडली. काय करावे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्याने नवा मार्ग निवडला खरा, पण चुकीचा निवडला. संपर्कात आलेल्यांच्या माध्यमातून तो गांजाची तस्करी करू लागला. वारंगल ते दिल्ली अशा रॅकेटमध्ये सामील झाला. रस्तेमार्गे खेप पोहोचवत असताना तो वर्धा मार्गावर बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागला. अटक झाली. शिवशंकर यल्लया इसमपल्ली (वय २७, रा. केसमुद्रम, वारंगल), असे या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. अंकुश शिंदे यांना नागपूरमार्गे गांजाची खेप जाणार असल्याची माहिती मिळाली. मार्ग वारंगल ते दिल्ली असा असल्याने बेलतरोडी पोलिसांना सतर्क करण्यात आले. डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया, हेडकॉन्स्टेबल तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, अविनाश ठाकरे, मनोज शाहू, राकेश, कुणाल व नितीन बावने यांच्या पथकाने वर्धा मार्गावर सापळा रचला. डीएल-४सी-एडी-३६६६ या क्रमांकाची कार पोलिस पथकाला दिसली. या कारवर त्यांना संशय आला. थांबण्यास सांगितले. कारचालकाने कार थांबविली नाही, उलट वेग वाढविला. यानंतर सुरू झाला पाठलाग. काही अंतरावर शिवशंकरला अडविण्यात पोलिसांना यश आले. कारची झडती घेतली असता आत ९२ किलो गांजा आढळला. पोलिसांनी त्याला अटक केली. कार जप्त केली. अटकेतील शिवशंकर याला रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

शिवशंकरने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर गांजाचे हे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपासासाठी बेलतरोडी पोलिसांचे एक पथक दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area