नाशिक: थकीत घरगुती वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती वीज बिल थकल्याने महावितरणचे कर्मचारी देवळा तालुक्यातील वासोळ येथे वसुलीसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना काही ग्रामस्थांनी मारहाण केली. त्यांना दमदाटी करून शिवीगाळही केली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. देवळा पोलीस ठाण्यात सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.