वय अवघे ७ वर्ष; भारतीय चिमुकल्याने सर केला किलीमांजारो

 समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असलेला हा पर्वत टांझानियामध्ये आहे.  हैदराबादमध्ये राहणाऱ्या ७ वर्षाच्या विराट चंद्र तेलुकुंट्टा या मुलाने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलीमांजारो सर केला आहे. हा पर्वत सर करणारा तो सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक ठरला आहे.  ६ मार्च रोजी विराटने त्याचे प्रशिक्षक भरत थम्मिननी यांच्यासोबत किलीमांजारो हा पर्वत सर करायला सुरुवात केली होती. तब्बल ७५ दिवसांच्या परिश्रमानंतर तो नुकताच भारतात परतला आहे.  विराट सिकंदराबाद  येथील गीतांजली देवशाला येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे.

समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असलेला हा पर्वत टांझानियामध्ये आहे.  हा पर्वत सर करण्यापूर्वी विराटने एक महिना ट्रेनिंग घेतलं होतं. बूट्स अॅण्ड क्रॅम्पन्स  या गिर्यारोहण कंपनीच्या माध्यमातून त्याने पर्वत सर करण्याचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर विराटने किलीमांजारो येथे जाण्याचा निर्णय घेतला.

"५ मार्चला मी सकाळी ९ वाजता किबू येथून रवाना झालो. याची उंची जवळपास ४ हजार ७२० मीटर आहे. हा संपूर्ण प्रवास खरंच प्रचंड आव्हानात्मक होता. अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ३.४० वाजता आम्ही उरु पर्वताकडे रवाना झालो. जे आफ्रिकेमधील सर्वात उंच ठिकाण आहे", असं विराटने सांगितलं. पुढे तो म्हणतो, प्रचंड धुकं आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मला बऱ्याचदा भिती वाटायची. कारण, काही वेळा समोरचं दिसतदेखील नव्हतं. त्यातच अंग गोठवणारी थंडी आणि अंधार यामुळे कायम घाबरायला व्हायचं. त्यातच हे शिखर सर करायला केवळ ८ तास बाकी असल्याचा विचार करुन मी पुन्हा मार्गस्थ व्हायचो.दरम्यान, किलीमांजारो सर करण्यापूर्वी विराटने योग्य प्रशिक्षण घेतलं होतं. अवघ्या सात वर्षाच्या असलेल्या विराटने एकही दिवस न चुकता प्रामाणिकपणे ट्रेनिंग पूर्ण केलं. या ट्रेनिंगमध्ये तो दररोज ६ किलोमीटर धावणे, पर्वत, टेकड्या चढणे आणि योग अशा अनेक गोष्टी करत होता. विशेष म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी दार एस सलामसाठी रवाना होण्यापूर्वी त्याने एका मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area