मोठी बातमी: डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार थेट 'वर्षा' बंगल्यावर?

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. 

दोन्ही नेत्यांमध्ये सचिन वाझे प्रकरणावरुन चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची ही भेट झाली. 

शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास  एक तास चर्चा सुरु होती. या भेटी दरम्यान सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची आज बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महाआघाडी सरकारमध्ये बरीच वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची प्रतिमा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवारांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणासह संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area