गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी एकास अटक ;98 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त




इचलकरंजी, दि.११ : बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी गावभाग पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप माळी असे त्याचे नाव असून त्याच्याकडुन गुटखा, सुगंधी सुपारी आणि दुचाकी असा 98 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तंबाखुजन्य पदार्थांचा साठा आणि तसेच वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील पंचगंगा नदी ते झेंडा चौक या मार्गावरून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार नदीवेस नाका, मरगुबाई मंदीरसमोर सापळा लावत वाहनांची तपासणी सुरू केली. 

त्यावेळी संदीप माळी याची दुचाकी संशयावरून थांबविण्यात आली. दुचाकीवरील पोत्याची तपासणी करता त्यामध्ये विविध कंपन्यांचा (company) गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी असा मुद्देमाल मिळून आला.  पोलिसांनी 54 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि दुचाकी असा 98 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area