अमावास्या, पौर्णिमेला भरणा-या दरबारात पाेलिसांचा छापा; भक्तांच्या समक्ष महाराजांना ठाेकल्या बेड्या

 या कारवाईत अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, ऍड. हौसेराव धुमाळ, जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, महिला हवालदार प्रिया दुरगुडे, हवालदार ए. के. नलवडे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर मुळीक, हवालदार गोविंद आंधळे आदी सहभागी झाले होते. याबाबत सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते भगवान गोविंद रणदिवे (रा. संगममाहुली, ता. सातारा) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
लोणंद (जि. सातारा) : अंगात दत्त संचारतो, असे सांगून दर मंगळवारी, शुक्रवारी, तसेच अमावास्या, पौर्णिमेला दरबार भरवून करणी, भूतबाधा, पिशाच्छ काढणे मूल न होणे आदींसह कोणत्याही शारीरिक समस्येवर शंभर टक्के दैवी उपाय सांगून येणाऱ्या भाविकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या पाडेगाव ( ता. खंडाळा) येथील भोंदूबाबास सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व लोणंद पोलिसांनी पकडून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून गजाआड केले.


पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती आशी की, पाडेगाव येथील विठ्ठल किसन गायकवाड गेल्या दोन वर्षांपासून घरात आर्थिक फायद्यासाठी स्वतःकडे अतिद्रिय दैवी शक्ती आहे, अंगात दत्त संचारतो, असे सांगून दर मंगळवारी, शुक्रवारी तसेच अमावास्या, पौर्णिमेला दरबार भरवून करणी, भूतबाधा, पिशाच्छ काढणे, मूल न होणे आदीसह कोणत्याही शारीरिक समस्येवर शंभर टक्के दैवी उपाय सांगून येणाऱ्या भाविकांची लुबाडणूक करीत आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांचे सहकारी डॉ. दीपक माने, ऍड. हौसेराव धुमाळ हे आज भक्त बनून या मांत्रिकाच्या थेट दरबारात गेले. त्यांच्यापुढे समस्यांचा पाढाच वाचताना आमच्या गाईला मोठी करणी झाली आहे. नागिणीचा त्रास आहे. आठ महिन्यांत 100 टक्के मूल होईल, असे सांगून या अंनिसच्या कार्यकर्त्यांना 11 फेऱ्या मारायला लावल्या. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले, की हा मांत्रिक येणाऱ्या भक्तांची आर्थिक व मानसिक फसवणूक करत असल्याचे समोर आले. कार्यकर्त्यांनी ही बाब अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांना कळवली. भोंदूबाबा जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग करत असल्याचे श्री. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी श्री. पाटील यांनी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी सहकारी आणि अंनिस कार्यकर्त्यांसमवेत पाडेगाव येथे जाऊन मांत्रिक विठ्ठल गायकवाड यांच्या घरात प्रत्यक्ष सुरू असलेला भोंदूबाबाचा दरबार गाठला.


अमावास्या असल्याने दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त आले होते. अंगात देवाचा संचार आणून समस्या सोडवणे सुरूच होते. पोलिसांना बघताच महाराज यांना घाम फुटला. सर्व आँखो देखा हाल पाहिल्यावर महाराजाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यास अटक केली. या कारवाईत अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, ऍड. हौसेराव धुमाळ, जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, महिला हवालदार प्रिया दुरगुडे, हवालदार ए. के. नलवडे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर मुळीक, हवालदार गोविंद आंधळे आदी सहभागी झाले होते. याबाबत सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते भगवान गोविंद रणदिवे (रा. संगममाहुली, ता. सातारा) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area