कोरेगाव पार्कात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय; पोलिसांचा छापा

 कोरेगाव पार्क परिसरात नॅचरल बॉडी स्पा सेंटर या नावाखाली वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची खबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना मिळाली होती.पुणे :
कोरेगाव पार्क परिसरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. तेथून पोलिसांनी नागालॅंड, मणिपूर, राजस्थान येथील 10 तरुणींची सुटका केली तर, व्यवस्थापकास अटक केली. अर्जुन गोपाल सिंग (वय 21, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाचे नाव आहे. तर स्पा सेंटरचा मालक विकास ढाले हा पळून गेला. दोघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वारगेट पोलिसांनी 2020मध्येही अशाच प्रकारे कारवाई करत कोरेगाव पार्कमधील वेश्या व्यवसायाचे रॅकेट उधळवून लावत मुलींची सुटका केली होती.


काय घडले? 

कोरेगाव पार्क परिसरात नॅचरल बॉडी स्पा सेंटर या नावाखाली वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची खबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला संबंधीत ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा पथकाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली संबंधित ठिकाणी वेश्‍याव्यावसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून व्यवस्थापकास अटक केली. तसेच 10 तरुणींची सुटका केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area