पुणे : लैंगिक अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

 महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.
पिंपरी:
महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

जिशान निजामुद्दीन शेख (वय २६, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१८ ते १० मार्च २०२१ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जिशान याचे पहिले लग्न झाले असतानाही त्याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच, तिच्या वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित महिलेसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच, फिर्यादीकडील ६० हजार रुपये घेतले. पुढील तपास सहायक निरीक्षक सपना देवतळे करत आहेत.

विवाहितेचा छळ 

पिंपरी : दोन्ही मुलीच झाल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरकडील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रवीण बाबुराव करडे (वय ४२), सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, मे २०१४ ते २९ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये निगडी आणि मोशी येथे ही घटना घडली.

मध्यस्थी करणाऱ्या आईला कात्रीने मारहाण 

पिंपरी : नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या आईला मुलाने कात्रीने मारहाण केली. तसेच, आठ महिन्यांच्या मुलीलादेखील कात्रीने मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (९ मार्च) रात्री थेरगाव येथे घडली.

अनिरुद्ध अप्पाराव वाघमारे (वय ३२, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुमित आप्पाराव वाघमारे (वय २९) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि पत्नीमध्ये वाद सुरू होते. पत्नीने जेवणाचे ताट नीट केले नाही, म्हणून आरोपी पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करत होता. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचे आई-वडील तेथे गेले. त्या वेळी आरोपीने स्वयंपाक घरात पडलेली कात्री उचलून आईला मारून जखमी केले. तसेच, त्याच्या आठ महिन्यांच्या मुलीला हातात घेऊन 'मी हिला सुद्धा कात्रीने मारेल,' अशी धमकी दिली.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area