डॉ. बोंडेसह भाजपच्या पाच नेत्यांविरुद्ध गुन्हा

 पंचवटी चौकात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांना प्रोत्साहित केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अमरावती:

पंचवटी चौकात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांना प्रोत्साहित केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे गुरुवारी पंचवटी चौकात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व भाजपचे काही पदाधिकारीदेखील पोहोचले. डॉ. बोंडे यांनी गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यासोबत अभद्र भाषेचा वापर केला. यासंदर्भात चोरमले यांनी तक्रार दिली आहे. 'डॉ. बोंडे यांनी आपल्यासोबत बोलताना अपशब्दांचा वापर केला. याशिवाय आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहित केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना सोडविण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला. यावेळी बोंडे यांच्यासह महिला पदाधिकारी, मनपा विधी सभापती प्रणित सोनी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, बादल कुळकर्णी उपस्थित होते. या सर्वांनी डॉ. बोंडेंना सहकार्य केले. पोलिसांना शिवीगाळ करण्यासोबत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आला,' असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या आधारावर भादंविच्या कलम गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area