'ती' बाळाला पोलिओ लस देण्याच्या बहाण्याने आली आणि...

 पोलिओ लस देण्याच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने येथील एका अडीच महिन्यांच्या लहानगीचे अपहरण केल्याने सोमवारी सकाळी येथे खळबळ उडाली होती.
मुंबई: पोलिओ लस देण्याच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने येथील एका अडीच महिन्यांच्या लहानगीचे अपहरण केल्याने सोमवारी सकाळी येथे खळबळ उडाली होती. मात्र उरण, पनवेल व तळोजा पोलिसांनी केलेल्या कारवाईत या अपहरणकर्त्या महिलेला अवघ्या ६ तासांत जेरबंद करण्यात आले. खांदा कॉलनी परिसरातून या महिलेस ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी या लहानगीस तिच्या आईवडिलांकडे सोपवले.

उरण तालुक्यातील नवघर गावात राहाणाऱ्या मनोज राजभर यांच्या घरी ही घटना घडली. सकाळच्या सुमारास आलेल्या एका महिलेने लहान मुलांना पोलिओ डोस द्यायचा असल्याचे सांगितले. मुलीला डोस दिला असल्याचे मनोज यांच्या पत्नीने सांगताच दुसरा डोस द्यायचा आहे, अशी बतावणी या महिलेने केली. गावातील अंगणवाडी येथे डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज यांची पतनी मोठी मुलगी संजना हिला कपडे घालत असल्याच्या संधीचा फायदा घेत बिछान्यावर असलेल्या मिताली हिला या महिलेने उचलले व रिक्षेत बसून पलायन केले होते.

या कुटुंबीयांनी रिक्षाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोल ठरला. या प्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area