'भगवान रामाप्रमाणे मोदींना पुजलं जाईल'; नवनिर्वाचित मुख्यमंत्र्याची स्तुतीसुमने

 उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी मोदींची तुलना भगवान रामाशी केली आहे.देहरादून-
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी मोदींची तुलना भगवान रामाशी केली आहे. तीरथ सिंह रविवारी ऋषिकुलच्या सरकारी कॉलेजच्या सभागृहात एका सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या 'नेत्रा कुंभ' या कार्यक्रमात बोलत होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, तीरथ रावत म्हणाले की, 'आज विविध देशांचे नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगेमध्ये उभे राहतात. सध्याची स्थिती पूर्वीपेक्षा फार वेगळी आहे. यापूर्वी जगातील नेत्यांना देशाचा पंतप्रधान कोणीही असला तरी फरक पडत नव्हता. नरेंद्र मोदींमुळे ही स्थिती बदलली आहे. हा नवा भारत असून पंतप्रधान मोदींनी याला बनवलं आहे. पूर्वीच्या काळी भगवान रामाने समाजासाठी चांगलं काम केलं होतं. त्यामुळे त्यांना लोक भगवान मानायचे. भविष्यात आपल्या प्रिय पंतप्रधानांसोबतही असं होईल'. 


तीरथ रावत यांच्या भाषणादरम्यान 'मोदी जिंदाबाद'च्या जोरदार घोषणा लागल्या. रावत पुढे म्हणाले की, 'कोणत्या मोठ्या उत्सावासाठी जाण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्ट किंवा तीर्थयात्रेसाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही'. ते पुढे म्हणाले की, 'केंद्र सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन केले जाईल. कुंभ मेळ्याप्रकरणी जे नकारात्मक वातावरण तयार करण्यात आले होते, ते हटवण्यात आले आहे. लोक कोणत्याही काळजी शिवाय येथे येऊ शकतात. त्यांना कोणीही अडवणार नाही'. मागील आठवड्यात भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांना उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या नावाची वर्णी लागली.


कोण आहेत तीरथ सिंह रावत? 

तीरथ सिंह रावत फेब्रुवारी 2013 ते डिसेंबर 2015 पर्यंत उत्तराखंड भाजप प्रदेश अध्यक्ष होते. ते चौबट्टाखालमधून आमदार 2012-2017)  राहिले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि गढवाल लोकसभेतून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना हिमाचल प्रदेशचा प्रभारीही बनवण्यात आलं होतं. 2000 मध्ये स्थापन झालेल्या उत्तराखंडचे ते पहिले शिक्षामंत्री होते. 2012 मध्ये ते चौबट्टाखाल विधानसभा मतदारासंघातून निवडले गेले. 2013 मध्ये त्यांच्याकडे उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षची जबाबदारी आली. 


आरएसएसचे प्रचारक होते तीरथ

 तीरथ सिंह 1983 ते 1988 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (उत्तराखंड) संघटन मंत्री आणि राष्ट्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी असल्यापासूनच झाली होती. ते विद्यार्थी संघ मोर्चाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चाचे (उत्तर प्रदेश) प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राहिले आहेत. 1997 मध्ये ते उत्तर प्रदेश विधान परिषदचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत 2,85,003 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area