गेल्या वर्षभरापासून पुणे जिल्ह्यासह इतर विभागांची संपुर्ण जबाबदारी विभागीय आयुक्त सौरभ राव हे कसोशीने पार पाडत आहेत. पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सौरभ राव यांच्यासह सर्वच जिल्हाधिकारी , प्रमुख अधिकारी रात्रंदिवस काम करत आहे.
पुणे :
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान विभागीय आयुक्तांनाच कोरोना झाल्याने आयुक्तांच्या बैठकीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येचे भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरापासून पुणे जिल्ह्यासह इतर विभागांची संपुर्ण जबाबदारी विभागीय आयुक्त सौरभ राव हे कसोशीने पार पाडत आहेत. पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सौरभ राव यांच्यासह सर्वच जिल्हाधिकारी , प्रमुख अधिकारी रात्रंदिवस काम करत आहे. सर्व अधिकारी कोरोनाच्या पहिली लाटेतून बचावले परंतु दुसऱ्या लाटेत मात्र बहुतेक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कोरोनाच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे अनेक कार्यलये बंद ठेवण्याची वेळ गेल्या 15 दिवसांमध्ये आली.
विभागीय आयुक्त अनेक महत्वाच्या निर्णय आणि नियोजनामध्ये सक्रिय होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठकीला उपस्थितही होते. सोमवारीही कार्यलायात बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे संपर्कात आलेल्या आधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील पुर्नवसन विभागातील तहसीलदार सुरेखा दिवटे देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहे.