पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग; 25 दुकाने जळून खाक

पुणे- पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 25 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कळतंय. पण, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील मच्छी मार्केटची 17 दुकाने आणि चिकन-मार्केटची दुकाने जळाली. अचानक आग लागल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. आग लागल्याचे समजताच अग्रिशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते. दरम्यान, आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. 

सकाळी चारच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर काहीवेळात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. पुण्यातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये मटण आणि चिकनची दुकाने आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

आगीत तब्बल पंचवीस दुकाने जळून भस्मसात झाली आहे. दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्या देखिला आगीत जळाल्या आहेत. आगीमध्ये 35 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.''प्राथमिक तपासणीवरून समजले की, डीप फ्रीजरमध्ये समस्या आहे आणि त्याचे कंप्रेसर फुटले ज्यामुळे आग लागली. तेथे बरीच प्लास्टिक व छताची रचना लाकडाची बनलेली आहे ज्यामुळे आग वेगाने पसरली. मासे व कोंबडी विभागांच्या जागेत कॅन्टोन्मेंटची  वीज जोडणी नाही. छावणी कनेक्शन एक वर्षापूर्वी महावितरणने खंडित केले होते. प्रत्येक दुकानदाराचे स्वतःचे वीज मीटर असते. कॅन्टोन्मेंट वीज जोडणीमुळे शॉर्ट सर्किट नाही.''

 - विजय चव्हाण, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, इलेक्ट्रिकल विभाग,  इन्चार्ज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area