भयंकर! १५ वर्षीय मुलीवर १५ ते २० जणांनी ९ दिवस केला सामूहिक बलात्कार

 राजस्थानच्या हाडौती परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सलग ९ दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांसह २० आरोपींना अटक केली आहे.
कोटा: राजस्थानमधील हाडौती परिसरात संतापजनक घटना घडली आहे. कोटा जिल्ह्याच्या सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षीय मुलीवर १५ ते २० जणांनी सामूहिक बलात्कार केला. सलग ९ दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात ४ अल्पवयीन मुलांसोबत २० आरोपींना अटक केली आहे. यात एक महिला देखील आहे.


अत्याचार केल्यानंतर वेदनेने विव्हळणाऱ्या बालिकेला ते नशेची औषधे द्यायचे. तिला मारहाणही करायचे. घरी जाऊ देण्याविषयी बोलल्यावर आरोपी तिला चाकूचा धाक दाखवायचे, अशी माहिती उघड झाली आहे. कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांच्या माहितीनुसार, ही घटना २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली आहे. आरोपी चौथमल, बुलबुल आणि पूजा जैन यांनी तिला दुचाकीवर बसवून बॅग देण्याच्या बहाण्याने झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. तेथे ओळखीच्या तीन-चार मुलांकडे तिला सोडले. पीडितेला पहिल्या दिवशी गागरोन येथील किल्ल्यावर घेऊन गेले. तेथून पुन्हा झालावाडमध्ये एका खोलीत डांबले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गागरोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ५ मार्चला आरोपी महिला बुलबुल आणि पूजा तिला झालावाडच्या सुकेतमध्ये घेऊन आल्या. दुसऱ्या दिवशी पीडिता आपल्या आईला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपबीती सांगितली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. चौधरी यांच्या माहितीनुसार, प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू केली. विविध पथके नेमली. आतापर्यंत चार अल्पवयीन मुलांसह २० जणांना अटक केली.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area