दलित वस्ती निधीसाठी धावाधाव

 जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अंतर्गत वादावर पडदा टाकत 36 कोटींच्या दलित वस्ती निधी वाटपावर शिक्‍कामोर्तब केले आहे, मात्र शिक्षण सभापती प्रवीण यादव व महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या निधीतील प्रत्येकी 20 लाख रुपयाला समितीने कात्री लावली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेत निधी वाढवून देण्याची मागणी केली. मंत्री पाटील यांनीही माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अंतर्गत वादावर पडदा टाकत 36 कोटींच्या दलित वस्ती निधी वाटपावर शिक्‍कामोर्तब केले आहे, मात्र शिक्षण सभापती प्रवीण यादव व महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या निधीतील प्रत्येकी 20 लाख रुपयाला समितीने कात्री लावली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेत निधी वाढवून देण्याची मागणी केली. मंत्री पाटील यांनीही माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे या पदाधिकाऱ्यांना सांगितले.  माणगाव येथील बैठकीत समाजकल्याण समितीने 36 कोटींच्या दलित वस्ती निधी वाटपावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांना प्रत्येकी 80 लाख देण्याचा निर्णय झाला. हा निधी देताना काही पदाधिकाऱ्यांच्या निधीला कात्री लावली. यात हातकणंगलेतील श्री. यादव व डॉ. पाटील यांच्या निधीत कपात केली. हा निधी इतर सदस्यांना दिला, मात्र आपल्या निधीत कपात करू नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे आज केली. या भेटीनंतर पालकमंत्र्यांकडून समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे निधी वितरणाबाबत चौकशी केली. सायंकाळी श्री. घाटे यांनी निधी वितरणाची माहिती दिली.  

पदाधिकारी बदलाची मागणी  महाविकास आघाडीच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे विविध प्रश्‍नांवर पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली, मात्र प्रत्येक सदस्याने भेटीवेळी मंत्री पाटील यांच्याकडे पदाधिकारी बदलाची मागणी केली. कोणत्याही पदाधिकाऱ्याला निधी वाढवून देऊ नका, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी नेलेल्या निधीची माहिती दिली. पालकमंत्र्यांनीही पदाधिकारी बदलास ग्रीन सिग्नल दिल्याचे सदस्यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area