अँटिलिया या निवासस्थानाजवळील स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकणी अटक करण्यात आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
हायलाइट्स:
- मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझे यांना १४ दिवसांची एनआयए कोठडी द्यावी अशी मागणी एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती.
- १० दिवसांची कोठडी मिळवल्यामुळे आता वाझे यांची चौकशी करण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकरणी (Antilia Case) अटक करण्यात आलेले मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. वाझे यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. १० दिवसांची कोठडी मिळवल्यामुळे आता वाझे यांची चौकशी करण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे.